file photo 
विदर्भ

या नक्षलग्रस्त तालुक्‍यातील 530 गरीब कुटुंबांना मिळत नाही रेशनचे धान्य 

यशवंत शेंडे

सालेकसा (जि. गोंदिया) : अन्नधान्यापासून कोणीही वंचित राहू नये, असे शासन वारंवार सांगते. मात्र, आजही गरजू, गरिबांना रेशनचे धान्यच मिळत नसल्याचे वास्तव आहे. उल्लेखनीय म्हणजे, श्रीमंतांची नावे बीपीएल यादीत समाविष्ट आहेत. प्रशासनाने गरजूंनादेखील धान्यवाटप होईल, या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे. 

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्‍यात 530 गरीब लाभार्थ्यांना धान्य मिळू नये, हे दुर्भाग्य म्हणावे लागेल. तालुक्‍यात 92 गावे आहेत. श्रीमंतांची नावे बीपीएल, अंत्योदय यादीत समाविष्ट आहेत. मात्र, मोलमजुरी करणाऱ्या लोकांची नावे एपीएलमध्ये आहेत. अन्नपुरवठा विभागाने त्यानुसार गाव सर्व्हे करून गरजू लोकांना अन्नधान्य द्यावे, अशी मागणी कार्डधारकांनी केली आहे. 

मोफत धान्य देण्यात येईल 
सालेकसा तालुक्‍यात 530 नागरिकांकडे रेशन कार्ड नाहीत. त्यामुळे कोरोनाच्या काळात मे व जून या दोन महिन्यांचे अन्नधान्य शासनाकडून प्रतिलाभार्थ्याला पाच किलो मोफत तांदूळ, गहू, डाळ व इतर धान्य देण्यात येईल. 
-डी. एस. बावनकर, अन्नपुरवठा निरीक्षक, तहसील कार्यालय, सालेकसा. 

रास्तभाव दुकानदाराकडून वितरण, विनियमनाचे उल्लंघन 
गोरेगाव तालुक्‍याच्या मोहाडी येथील रास्तभाव दुकानदार मदनलाल बघेले यांच्या दुकानाच्या तक्रारीची चौकशी 2 जूनला निरीक्षक अधिकारी नीलेश देठे, पुरवठा निरीक्षक पी. जी. हांडे (गोंदिया) यांनी केली. या चौकशीत रास्तभाव दुकानदार मदनलाल बघेले यांनी महाराष्ट्र अनुसूचित वस्तू (वितरण व विनियमन) आदेश 1975 चे उल्लंघन केल्याचे अहवालात म्हटले आहे. 

निरीक्षक अधिकारी यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, मोहाडी येथील 10 शिधापत्रिकाधारकांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना 23 मे रोजी तक्रार केली आहे. त्या तक्रारीची दखल घेत मोहाडी येथील रास्तभाव दुकानाची चौकशी व तक्रारदार अजय पटले, कमलेश पारधी, गोमराज बिसेन, माया पटले, किशोर राणे, तेजराम पटले, ओंकार उके, रामलाल धपाडे, राजेंद्र पटले, चुन्नीलाल पटले यांचे बयाण घेण्यात आले. 

रास्तभाव दुकानदार मदनलाल बघेले पावती देत नाही. दर्शनी भागात अंत्योदय योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांची फलक नाही. तक्रार पुस्तिका नाही. प्रत्यक्ष दुकानात तांदूळ 15 किलो व गहू 10 किलो व चणाडाळ 3 किलो कमी आढळून आली आहे. मोफत वाटपाचे तांदूळ शिधापत्रिकाधारकांना कमी वाटप केले आहे. तसेच पाच रुपये अधिकचे घेऊन लूट करीत आहे, असा अहवाल निरीक्षक अधिकारी नीलेश देठे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सादर केला आहे. या अहवालानुसार रास्तभाव दुकानदार मदनलाल बघेले यांच्यावर कारवाई करून परवाना रद्द करण्यात यावा. शिधापत्रिकाधारकांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी अजय पटले यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT